logo

*श्री शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण* *तीन विद्यार्थी ठरले शिष्यवृत्ती पात्र*


महेंद्र महाजन
रिसोड

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड चे तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले असून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
इयत्ता पाचवी चे गौरव किसन वानरे, कु प्रवरा गणेश अंभोरे व कु.तन्वी अमोल भगत हे तीन विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या पालकांसह त्यांचे शिक्षक श्री.पांडुरंग वाळले, श्री.विजय नागरे, कु.नीता गिऱ्हे, यांना दिले आहे. त्याबद्दल शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजयराव देशमुख, उपप्राचार्य संजयराव नरवाडे, उपमुख्याध्यापक अशोकराव देशमुख यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून त्यांना पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

37
2893 views